Dian Forrester has joined Chennai Super Kings as Jamie Overton’s replacement
esakal
Jamie Overton ruled out of IPL 2026 due to injury: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या शेवटच्या टप्प्यात संघात मोठा बदल केलेला आहे. जेमी ओव्हरटनने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर डियन फॉरेस्टर ( Dian Forrester ) याला करारबद्ध केले आहे. CSK ने ११ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले आहे. त्यांना उर्वरित ३ सामने जिंकून १८ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचता येणार आहे. अशात फॉरेस्टरच्या येण्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे.