Ruturaj Gaikwad anchors Chennai Super Kings innings
esakal
Chennai Super Kings vs Gujarat Titans Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावर कोंडी झालेली पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी यजमान CSK ला ४ बाद ३७ अशा कोंडीत पकडले होते. पण, सामना हातात आल्याचे दिसताच निर्धास्त झालेल्या GT च्या खेळाडूंनी काही झेल टाकले अन् त्याचाच फायदा CSK ने उचलला. कर्णधार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) मैदानावर उभा राहिला आणि त्याला शिवम दुबेची साथ मिळाली. चेन्नईने पडझडीनंतर गुजरातसमोर सन्मानजनक धावसंख्या उभी केली. चेन्नईने आजच्या सामन्यात ६० हून अधिक चेंडू निर्धाव खेळले.