Heinrich Klaasen angry after Sanju Samson stumping
esakal
Sanju Samson unbelievable stumping video viral: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना अटीतटीचा होताना दिसतोय... चेन्नईच्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना SRH ला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. पण, इशान किशन व हेनरिच क्लासन या जोडीने सामना CSK च्या हातून खेचून आणला. विजयासाठी अवघ्या ५० धावा हव्या असताना नूर अहदमने ही भागीदारी तोडली. संजू सॅमसनने यष्टिंमागे विजेच्या वेगाने बेल्स उडवून क्लासनला माघारी पाठवले. पण, संतापलेल्या क्लासन जाताजाता संजूसोबत भांडताना दिसला. तो त्याच्या अंगावर धावलाही होता, शिवम दुबेने त्याला मागे केले.