Tim David punished for offensive gesture in IPL 2026
esakal
Tim David punished for offensive gesture in IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ५४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) मुंबई इंडियन्सवर ( MI) दोन गडी राखून रोमहदर्षक विजय मिळवला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता आणि रसिख सलामने डाईव्ह मारून दुसरी धाव पूर्ण केली. या अत्यंत तणावपूर्ण सामन्यात कृणाल पांड्याने ७३ धावांची मॅच विनिंग खेळी केली. दरम्यान, या सामन्यात टीम डेव्हिडच्या ( Tim David) कृतीची चर्चा रंगली होती आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली.