

Cooper Connolly Shines on Debut, Guides PBKS to Thrilling Win
esakal
IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans Marathi Updates : पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना चुरशीचा झाला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील मंगळवारी न्यू चंदिगढ येथे झालेल्या सामन्यात PBKS १६३ धावांचे लक्ष्य सहज पार करेल, असे वाटले होते. पण, GT ने शेवटपर्यंत मॅच नेली. श्रेयस अय्यरच्या विकेटनंतर पंजाबने पटापट ८ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, Cooper Connolly मैदानावर उभा राहिला आणि सामना पंजाबने जिंकला.