CSK vs DC Live : MS Dhoni हॉटेलमध्येच थांबला... चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मात्र 'तो' स्टार परतला, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघात बदल

IPL 2026 CSK vs DC Marathi Cricket News : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. MS Dhoni या सामन्यात मैदानावर उतरलेला नाही. तो सध्या हॉटेलमधून सामना पाहत असून लवकरच पुनरागमन करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Delhi Capitals have won the toss

Delhi Capitals have won the toss

Updated on

Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये एकही विजय न मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्सला आज प्रतिष्ठेच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीला मागील सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर पराभूत केले होते, त्यामुळे ते विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चेन्नईला ३ सामन्यात हार पत्करावी लागली आहे आणि त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता पुढील सामने जिंकणे गरजेचे आहे. MS Dhoni केव्हा परतणार? हा चेन्नईच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आजही अनुत्तरीत राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com