hardik pandya vs shubman gill
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: गुजरात टायटन्स घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलून खचलेल्या मुंबई इंडियन्सला नमवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील GT vs MI सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. MI चा संघ सलग चार पराभव पत्करून गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे, तर GT ने ५ पैकी ३ सामने जिंकून सहावे स्थान पटकावले आहे. त्यांना आज विजयी चौकार मारून तालिकेत चौथ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.