Why Prithvi Shaw was not selected in PBKS vs DC match
esakal
Punjab Kings vs Delhi Capitals Marathi Update: सलग तीन पराभवामुळे पंजाब किंग्सला प्ले ऑफच्या शर्यतीत धक्के सहन करावे लागले आहेत आणि आता स्पर्धेच्या या टप्प्यात त्यांना चूक परवडणारी नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज त्यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे. DC कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाच बदलांसह ते मैदानावर उतरले आहेत. पण, या पाच बदलांमध्ये पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचे नाव नसल्याने नेटकरी खवळले आहेत.