Shubman Gill-led Gujarat Titans now face a hectic travel schedule
esakal
Gujarat Titans hectic travel schedule after Qualifier 1 defeat: गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या क्वालिफायर १ सामन्यात मंगळवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलच्या संघाला २५४ धावांचा पाठलाग करताना १६२ धावाच करता आल्या आणि RCB ने ९२ धावांनी हा सामना जिंकला. GT ला आयपीएल २०२६च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी आहे आणि त्यासाठी त्यांना क्वालिफायर २ मध्ये विजय मिळवावा लागला आहे. GT ला क्वालिफायर १ जिंकून थेट आयपीएल फायनल गाठता आली असती, परंतु पराभवासह त्यांच्यासमोर आणखी एक संकट उभं राहिलं आहे.