IPL 2026 : हार्दिक पांड्याने रायपूरसाठी विमान पकडलं! पण, त्याला खेळवायचं की नाही, याचा Mumbai Indians करतेच विचार; कारण काय?

Will Hardik Pandya Play Against RCB? हार्दिक पांड्या याने रायपूरसाठी विमान पकडल्याची माहिती समोर आली असून, तो लवकरच Mumbai Indians संघासोबत जोडला जाणार आहे. मात्र, IPL 2026 मधील RCB विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला खेळवायचे की नाही, याबाबत मुंबई इंडियन्स व्यवस्थापन अजूनही संभ्रमात आहे.
Hardik Pandya Flies to Raipur

Hardik Pandya Flies to Raipur

esakal

Updated on

Why Mumbai Indians are unsure about Hardik Pandya? मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील कामगिरी निराशाजनक झालेली आहे. त्यांना १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवता आले आहेत आणि ६ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत. या परिस्थितीत उर्वरित चार सामने जिंकून ते १४ गुणांपर्यंत पोहोचतील आणि प्ले ऑफसाठी ही गुणसंख्या पुरेशी नाही. पण, हे उर्वरित चार सामने हार्दिक पांड्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI चा संघ तिसरे पर्व खेळतोय आणि पाचवेळच्या विजेत्यांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com