IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या 'हालचाली'वर मुंबई इंडियन्सचे बारीक लक्ष; धर्मशाला येथे संघासोबत जाण्यापासून थांबवले... नेमकं काय घडतंय?

Mumbai Indians assessing Hardik Pandya fitness in Mumbai: मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल २०२६च्या निर्णायक टप्प्यात मोठी चिंता निर्माण झाली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याला मुंबईतच थांबवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवही पुढच्या सामन्यासाठी संघासोबत धर्मशाला येथे दाखल झालेला नाही.
Hardik Pandya back spasm injury update IPL 2026

Hardik Pandya back spasm injury update IPL 2026

esakal

Updated on

Suryakumar Yadav yet to reach Dharamsala for IPL match: कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचे मालक नाखुश असल्याच्या बातम्या सुरू आहेत... काहींच्या मते हार्दिकचे कर्णधारपद जाणार आहे, परंतु अद्याप संघाकडून किंवा व्यवस्थापन असा कोणताच विचार करत नसल्याची माहिती समोर आहे. पण, BCCI ने गर्लफ्रेंड पॉलिसी आणल्यामुळे हार्दिक नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. त्यात हार्दिकचे संघासोबत नसणे, अनेक चर्चांना खतपाणी घालत आहेत. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना धर्मशाला येथे होणार आहे आणि रोहित शर्मासह बरेच खेळाडू तेथे दाखलही झाले आहेत. पण, हार्दिकला मुंबईतच थांबवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com