IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

Will Hardik Pandya play against RCB IPL 2026? हार्दिक पांड्या गुरुवारी रात्री रायपूरमध्ये Mumbai Indians संघासोबत दाखल झाला. मात्र, शुक्रवारी झालेल्या सराव सत्रात त्याने सहभाग घेतला नाही. त्यामुळे आयपीएल २०२६ मधील Royal Challengers Bengaluru विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता कायम आहे.
Hardik Pandya absent as Mumbai Indians squad departs for Raipur

Hardik Pandya absent as Mumbai Indians squad departs for Raipur

esakal

Updated on

Hardik Pandya skips Mumbai Indians practice in Raipur: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गुरुवारी रात्री रायपूर येथे दाखल झाला. पण, शुक्रवारी संघाच्या सराव सत्रात त्याने सहभाग घेतला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबईला रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळायचा आहे. हार्दिकला पाठदुखीचा त्रास झाला होता आणि त्यामुळे त्याला मागील सामन्याला मुकावे लागले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने MI चे नेतृत्व सांभाळले होते आणि तो सामना जिंकला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com