Mumbai Indians Announce Ticket Sale Phases For IPL 2026 Home Matches
esakal
how to buy Mumbai Indians tickets IPL 2026? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. सलामीचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. BCCI ने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकानुसार MI घरच्या मैदानावर २ सामने खेळणार आहेत आणि आता मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानावरील तिकिटांच्या विक्रीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.