IPL 2026: ३ षटकांत ५३ धावा देणाऱ्या प्रफुल हिंगेवर दाखवला विश्वास; विजय मिळताच काव्या मारननं केलं 'सैराट' सेलिब्रेशन Video Viral

Kavya Maran celebration SRH last over win IPL 2026 video: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा रोमांचक विजय मिळवत चाहत्यांची मनं जिंकली. सनरायझर्स हैदराबादच्या प्रफुल हिंगेने सुरुवातीच्या तीन षटकांत ५३ धावा दिल्या होत्या. पण, इशान किशनने त्याच्यावर विश्वास दाखवत शेवटचं २०वं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्याकडेच दिली.
Kavya Maran celebrates passionately after SRH clinch a dramatic last-over victory.

Kavya Maran celebrates passionately after SRH clinch a dramatic last-over victory.

esakal

Updated on

Praful Hinge 20th over bowling comeback IPL match: विदर्भच्या प्रफुल हिंगेला २०वे षटक देण्याचा कर्णधार इशान किशनचा डाव फसला असता तर... कारण सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजाने ३ षटकांत ५३ धावा दिल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. तरीही इशानने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थ ठरवताना SRH ला १० धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा रोमहर्षक विजय पाहून SRH ची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिलाही तिचा आनंद रोखता आला नाही आणि तिच्या सैराट सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com