Kolkata Knight Riders register their first win of IPL 2026
esakal
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. राजस्थान रॉयल्सच्या १५५ धावांचा पाठलाग करताना KKR च्या आघाडीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. पण, रिंकू सिंगला ( Rinku Singh) दिलेले जीवदाना RR ला महागात पडले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रिंकू ८ धावांवर असताना नांद्रे बर्गरने त्याचा सोपा झेल टाकला होता. तोच क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला आणि रिंकूने KKR ला मॅच जिंकून दिली.