

LSG vs GT | IPL 2026
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) दोन सामने होणार आहेत. या सामन्यातील पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.दोन्ही संघांचा हा या हंगामातील चौथा सामना आहे.
दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.या सामन्यासाठी गुजरातने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. तसेच लखनौने देखील कोणतेही बदल प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेले नाहीत. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांचे गेल्या सामन्यातील त्यांचे प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूच खेळताना दिसणार आहेत.
प्लेइंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, एडन मार्कराम, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव
इम्पॅक्ट प्लेअरचे पर्याय : मणिमारन सिद्धार्थ, जॉर्ज लिंडे, मॅथ्यू ब्रेट्झके, शाहबाज अहमद, मयंक यादव
गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल(कर्णधार), जॉस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, राशिद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेअरचे पर्याय : शाहरुख खान, मानव सुथार, जेसन होल्डर, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत
लखनौ सुपर जायंट्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी पहिला सामना गमावल्यानंतरचे दोन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सची सुरुवात मात्र फारशी चांगली झालेली नाही. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ १ धावेने थरारक विजय मिळवला होता.
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात आत्तापर्यंत ७ सामने झाले आहेत. हे दोन्ही संघ २०२२ मध्ये आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत या दोन संघात झालेल्या ७ सामन्यांपैकी ४ सामने गुजरातने, तर ३ सामने लखनौने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.