Irfan Pathan prediction about MS Dhoni retirement
esakal
Irfan Pathan prediction about MS Dhoni retirement: इंडियन प्रीमिअर लीगचे आणखी एक नवीन पर्व अन् पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल निवृत्तीची चर्चा रंगली आहे. मागील ५-६ वर्षांपासून ही चर्चा रंगतेय आणि प्रत्येकवेळी धोनी अनेकांना चकवा देतोय. पण, यावेळी ते शक्य होईल असे दिसतेय, कारण चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) धोनीला पर्याय म्हणून संजू सॅमसनला ( Sanju Samson) राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या किमतीत ट्रेड केले आहे. त्यामुळे MS Dhoni च्या निवृत्तीची शक्यता बळावली आहे. त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही तशी भविष्यवाणी केली आहे.