MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Rohit Sharma fastest fifty IPL 2026 MI vs KKR highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत आयपीएल इतिहासात नवा विक्रम केला. त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतील सर्वात जलद फिफ्टी झळकावली.
Rohit Sharma smashes a 23-ball fifty, registering the fastest IPL half-century of his career ( Photo -  Vijay Bate)

Rohit Sharma smashes a 23-ball fifty, registering the fastest IPL half-century of his career ( Photo - Vijay Bate)

esakal

Updated on

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: रोहित शर्माने आज मुंबईचे वानखेडे स्टेडियम दणाणून सोडलं... त्याच्या चौकार-षटकारांनी चाहत्यांना खूश केलं, पण त्याचवेळी कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. KKR च्या २२० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी १० षटकांत १२० धावांचा टप्पा ओलांडून विजयाचा पाया भक्कम केला. रोहितने आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक झळकावले. त्याला रायन रिकेल्टनची दमदार साथ मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com