KKR vs LSG Live : मोहम्मद शमीने षटकार खेचला, सामना Super Over मध्ये गेला! कोलकाता नाइट रायडर्सने विजयाची संधी गमावली

IPL 2026 points table after KKR vs LSG match: आयपीएल 2026 मधील लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना अक्षरशः थरारक ठरला. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.
Mohammed Shami last ball six vs KKR IPL 2026 super over match

Mohammed Shami last ball six vs KKR IPL 2026 super over match

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Marathi Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना चुरशीचा झाला. मोहसिन खानच्या पाच धक्क्यानंतर रिंकू सिंगच्या आक्रमक फटकेबाजीने कोलकाताला सावरले. KKR च्या १५५ धावांचा पाठलाग करताना LSG चा डावही गडगडला होता. कर्णधार रिषभ पंत आणि एडन मार्करमच्या चांगल्या खेळीनंतर आयुष बदोनी ( Ayush Badoni) ने फिनिशरची भूमिका पार पाडताना दिसला, परंतु वरुण चक्रवर्थीने मोक्याच्या क्षणी त्याचा काटा काढला. कार्तिक त्यागीने २०व्या षटकात दोन नो बॉल टाकून लखनौला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली. मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com