IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

Will Bumrah play IPL 2026 opener against KKR? मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी पण थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल २०२६ पूर्वी संघात दाखल झाला असला तरी तो KKR विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार का, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
Jasprit Bumrah joins Mumbai Indians squad

Jasprit Bumrah joins Mumbai Indians squad

esakal

Updated on

Jasprit Bumrah injury update before MI vs KKR IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला आजपासून सुरूवात होतेय आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्याने १९ व्या पर्वाची सुरूवात होईल. पण, मुंबई इंडियन्सचे फॅन्स रविवारची वाट पाहत आहेत. पाचवेळचा विजेता Mumbai Indians रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करायला उतरणार आहे. मात्र, या सामन्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच जसप्रीत बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलेन्स ( CoE) येथे दाखल झाला होता, जिथे त्याच्या वर्कलोडचे म्हणजेच कामाच्या ताणाचे व्यवस्थापनावर चर्चा केली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com