Mahipal Lomror and Ruchit Ahir Join Squad
Mahipal Lomror Ruchit Ahir joins Mumbai Indians as replacement player: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दोन बदल पाहायला मिळत आहेत. मुंबईला यंदाच्या पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही आणि त्यांना १३ सामन्यांत ९ पराभवांचा सामना करावा लागला. रविवारी घरच्या मैदानावर ते राजस्थान रॉयल्सविरुद्ध या पर्वातील त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळणार आहेत. पण, त्याआधी त्यांनी दोन बदली खेळाडूंची घोषणा केली.