Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

Mumbai Indians predicted playing XI vs Delhi Capitals 2026: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. मिचेल सॅन्टनर संघात दाखल झाला असून त्यामुळे प्लेइंग इलेव्हन निवडताना हार्दिक पांड्यापुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विश्रांती घेतलेल्या सॅन्टनरने आता संघात पुनरागमन केलं आहे.
Predicted Mumbai Indians Playing XI vs DC Who will Mitchell Santner replace

Predicted Mumbai Indians Playing XI vs DC Who will Mitchell Santner replace

esakal

Updated on

Who will Mitchell Santner replace in MI lineup? मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील पहिल्या सामन्यात लागलेला पराभवाचा शाप अखेर यंदाच्या पर्वात मिटवला. १३ वर्षानंतर MI ने आयपीएलच्या नव्या पर्वातील पहिला सामना जिंकला. वानखेडे मैदानावर त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.

आता आर्थिक राजधानीतून मुंबई इंडियन्सचा संघ देशाच्या राजधानीत, म्हणजेच दिल्लीत दाखल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे. दिल्लीनेही त्यांच्या पहिल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपला दबदबा दाखवण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी उतरतील. पण, मुंबईसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com