Rohit Sharma acknowledges MI physio Amitt Dubey and trainer Pratik Kadam
esakal
who are Pratik Kadam and Amitt Dubey MI staff? मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अडचणीत सापडला आहे आणि अशात रोहित शर्माला पाच सामन्यांना दुखापतीमुळे मुकावे लागले होते. मात्र, काल रोहितने पुनरागमन केले आणि लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने ४४ चेंडूंत ८४ धावांची खेळी करताना रायन रिकल्टन ( ८३) सोबत सलामीला १४३ धावांची भागीदारी केली. रोहितचा कालचा खेळ हा, चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा होता आणि खेळत असताना तो कुठेही दुखापतीशी संघर्ष करतोय असे जाणवले नाही.