

MS Dhoni - Rohit Sharma | MI vs CSK | IPL 2026
Sakal
IPL 2026, MI vs CSK Marathi News: सर्वाधिक पाच वेळा आयपीएल जिंकणारे कर्णधार; परंतु दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असलेले रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी तंदुरुस्त होऊन परतण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) असा सामना होत असला तरी धोनी विरुद्ध रोहित यांच्यातील संभाव्य लढतीची उत्सुकता असेल.
रोहितला (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे, तर धोनीचा (MS Dhoni) पोटरीचा स्नायू दुखावलेला आहे. दोघेही आजच्या सामन्यात खेळण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळण्याची शक्यता वाढलेली आहे. रोहित सुरुवातीला काही सामने खेळलेला आहे. धोनी मात्र चेन्नईचे सहा सामने झाले, तरीही मैदानात उतरलेला नाही.