

captains to request a ball change in the second innings if it becomes unfit
esakal
IPL 2026 playing conditions changes: इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व जवळ आले असताना प्रेक्षकांना रोज नवनवीन ट्विस्ट पाहायाल, ऐकायला मिळतोय... बीसीसीआयने काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व फ्रँचायझींसोबत एक बैठक बोलावली आहे आणि त्यात काही नियमांवर चर्चा केली जाणार आहे. दोन बाऊन्सरचा नियम, बॅट तपासणी, बॉल बदलणे, लाळेचा वापर आणि रिटायर्ड-आऊट तरतूद यांसारख्या बाबींवरील चर्चा होण्याची अपेक्षा आहे.