IPL 2026 could begin with a blockbuster clash between RCB and CSK
esakal
IPL 2026 schedule latest news finalists RCB PBKS separate: इंडियन प्रीमिअर लीगच्या १९ व्या पर्वात परंपरेला छेद देताना पाहायला मिळणार आहे. आयपीएल परंपरेनुसार नव्या पर्वाची सुरुवात ही मागील पर्वातील विजेते व उपविजेते यांच्यातल्या सामन्याने होते. पण, आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) आणि पंजाब किंग्स ( PBKS) यांच्यात सामना होणार नाही. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या पर्वात RCB व PBKS हे वेगवेगळ्या प्रतिस्पर्धींविरुद्ध पर्वाची सुरुवात करतील. यंदाच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांच्यात पहिला सामना होण्याचा अंदाज आहे.