IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

Mumbai Indians eliminated from IPL 2026 playoff race: मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशांवर अखेर पूर्णविराम लागला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव करत त्यांना स्पर्धेबाहेर फेकले. या विजयात कृणाल पांड्या खरा हिरो ठरला. त्याच्या अष्टपैलू खेळीमुळे RCB ने दबावाच्या क्षणी सामना आपल्या बाजूने वळवला.
Royal Challengers Bengaluru defeated Mumbai Indians in IPL 2026

Royal Challengers Bengaluru defeated Mumbai Indians in IPL 2026

esakal

Updated on

IPL 2026 points table after RCB vs MI : मुंबई इंडियन्स आणि विजय... यांच्यामध्ये कृणाल पांड्या ( Krunal Pandya) उभा राहिला आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवून दिला. कॉर्बिन बॉशने चार विकेट्स घेऊन सामन्यात रंगत निर्माण केली होती, त्यात तिलक वर्माने सीमारेषेवर अफलातून झेल घेऊन MI ला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. पण, RCB ने या विजयासह इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. पण, ११ सामन्यांतील आठव्या पराभवामुळे MI स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून लखनौ सुपर जायंट्सनंतर मुंबई इंडियन्सही बाहेर पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com