IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Qualification Equation Gets Crazy: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ प्लेऑफची शर्यत आता अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. अवघ्या चार जागांसाठी तब्बल सात संघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून गुणतालिकेतील समीकरणे चाहत्यांचे डोके फिरवणारी ठरत आहेत.
IPL 2026 playoff qualification scenario explained

IPL 2026 playoff qualification scenario explained

Updated on

IPL 2026 playoff qualification scenario explained: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. आयपीएल गुणतालिकेत त्यांनी ९ गुणांसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि आता चार जागांसाठी अजूनही ७ संघ शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स हे बाद वाटत असले तरी त्यांच्यासाठी अजूनही अंधुक संधी आहे. त्यासाठी त्यांना इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com