Gujarat Titans reach top of IPL 2026 points table
esakal
Gujarat Titans reach top of IPL 2026 points table : गुजरात टायटन्सने गोलंदाजांच्या जोरावर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवलेली दिसतेय... या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक २५ विकेट्स घेणाऱ्या संघात अव्वल स्थानी GT विराजमान आहे. त्यांच्या गोलंदाजांची ताकद काय, हे मंगळवारी आक्रमक फलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिसली. कागिसो रबाडाने पॉवर प्लेमध्ये SRH चे कंबरडे मोडले आणि त्यानंतर जेसन होल्डरनेही तीन धक्के दिले. GT ने सलग पाचव्या विजयाची नोंद करताना IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.