IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

IPL 2026 playoff scenario after PBKS vs MI match: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफची शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे. सलग पाचव्या पराभवानंतर पंजाब किंग्सच्या अडचणी वाढल्या असून त्यांचे प्ले ऑफमधील स्थान धोक्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने तिलक वर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर PBKS वर महत्त्वाचा विजय मिळवला.
Mumbai Indians changed IPL playoff equation

Mumbai Indians changed IPL playoff equation

esakal

Updated on

Punjab Kings qualification chances in IPL 2026: पंजाब किंग्सने पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना निराश केले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या टप्प्यात Point Table वर अव्वल असलेला हा संघ, आता प्ले ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. मुंबई इंडियन्सने गुरुवारी तिलक वर्मा आणि शार्दूल ठाकूरच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. PBKS चा हा सलग पाचवा पराभव ठरला आणि ते १२ सामन्यांत १३ गुणांसह चौथ्या स्थानावरच राहिले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १२ गुण असलेल्या संघाल आता प्ले ऑफमध्ये शिरण्याची आयती संधी मिळाली आहे. या दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ सामने शिल्लक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com