

IPL 2026 Points Table PBKS Tighten Grip at No.1, LSG Slip Further Down
esakal
Punjab Kings unbeaten run IPL standings marathi Updates: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखताना IPL 2026 Point Table मधील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. आयपीएलच्या या पर्वातील सर्वोच्च धावसंख्या उभी केल्यानंतर पंजाब किंग्सचा पराभव अशक्यच होता. लखनौ सुपर जायंट्सची मागील कामगिरी पाहता, त्यांना विजय मिळवणे अवघडच होते. तरीही त्यांच्याकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. LSG चा हा सलग तिसरा पराभव ठरला आणि ते आठव्या क्रमांकावर कायम राहिले.