IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

IPL 2026 points table latest SRH vs PBKS update : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सनरायझर्स हैदराबादने बुधवारी पंजाब किंग्सवर शानदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. २२० पेक्षा अधिक धावा उभारल्यानंतर SRH चा विजय जवळपास निश्चित असतो, हे समीकरण त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
Sunrisers Hyderabad  climb to the top of IPL 2026 points table

Sunrisers Hyderabad climb to the top of IPL 2026 points table

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: २२०+ धावा उभारल्यानंतर विजय पक्का, हे समीकरण सनरायझर्स हैदराबादने कायम राखले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून SRH ने गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. PBKS ची मक्तेदारी मंगळवारी संपुष्टात आली आणि आता प्ले ऑफची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. हैदराबादने आज तिन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवले, तेच पंजाबला ३ झेल सोडणे महागात पडले. आता प्ले ऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. कूपर कॉनलीने ( COOPER CONNOLLY’S FIGHTING KNOCK) खणखणीत शतक झळकावले, पंरतु पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी त्याची एकट्याची झुंज कामी नाही आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com