RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

Prithvi Shaw chidiya udd video RR vs DC IPL 2026: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या खेळामुळे नव्हे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात तो डगआउटमध्ये ‘चिमणी उडे, कावळा उडे’ हा खेळ खेळताना दिसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Prithvi Shaw spotted enjoying a ‘Chidiya Udd’ game in the Delhi Capitals dugout.

Prithvi Shaw spotted enjoying a ‘Chidiya Udd’ game in the Delhi Capitals dugout.

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Delhi Capitals Marathi Update: ऐक काळ असा होता की पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) याची महान फलंदाज सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा यांच्यासोबत तुलना झाली होती. पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेट गाजवले होते आणि भारतीय संघाकडून त्याला पदार्पणाची संधीही मिळालेली. पण, दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला अन् नंतर अनेक वादात अडकत गेला. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले ते झालेच... फक्त टीम इंडियाच नव्हे, तर मुंबईच्या संघानेही त्याला गैरशिस्तीमुळे बाहेर केले, दिल्ली कॅपिटल्सनेही एका हंगामात त्याला संघात घेतले नव्हते. आपल्या खेळाने चर्चेत राहिलेला पृथ्वी आज चक्क दिल्ली कॅपिटल्सच्या डग आऊटसमोर बसून 'चिमणी उडे, कावळा उडे'खेळताना दिसला अन् नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com