MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

IPL 2026 MI vs PBKS Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मध्ये Mumbai Indians विरुद्ध Punjab Kings सामन्यात क्विंटन डी कॉकने अप्रतिम शतक झळकावत सामना फिरवला. या खेळीत त्याने MS Dhoni यांचा विक्रमही मोडला.मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली होती. २ बाद १२ धावसंख्येवर संघ अडचणीत सापडला होता. अर्शदीप सिंगने सुरुवातीला दोन विकेट्स घेत मुंबईला धक्का दिला.
Quinton De Cock

Quinton De Cock

esakal

Updated on

Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: मुंबई इंडियन्सने २ बाद १२ धावसंख्येवरून पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. अर्शदीप सिंगने दोन चेंडूंत मुंबईच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. नमन धीरही १० धावांवर बाद झाला असता, परंतु युझवेंद्र चहलने सोडलेला झेल पंजाबला महागात पडला. नमन आणि क्विंटन डी कॉक यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून मुंबईला मजबूत स्थितीत आणले. क्विंटनने पंजाबच्या गोलंदाजांना चांगला चोप देताना शतक पूर्ण केले आणि महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com