IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Rajasthan Royals sold for 1.63 billion details: इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स या संघाच्या मालकीत मोठा बदल होणार आहे. अमेरिकेत स्थायिक उद्योजक Kal Somani यांच्या नेतृत्वाखालील समूहाने तब्बल १.६३ अब्ज डॉलर (सुमारे १.५२ लाख कोटी रुपये) मोजून राजस्थान रॉयल्सची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
Rajasthan Royals sold for $1.63 billion to a Kal Somani-led consortium

Rajasthan Royals sold for $1.63 billion to a Kal Somani-led consortium

esakal

Updated on

Rajasthan Royals new owners consortium details : इंडियन प्रीमियर लीग (IPL ) मधील राजस्थान रॉयल्स (RR) हा संघ Kal Somani यांच्या नेतृत्वाखालील समूहाला १.६३ अब्ज डॉलरमध्ये विकण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिली. या समूहामध्ये वॉलमार्टचे रॉब वॉल्टन ( Rob Walton) यांचा समावेश आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. या करारावर स्वाक्षरी झाली असून, २०२६ च्या आयपीएल हंगामानंतर तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि या वर्षीच्या स्पर्धेनंतर हे अधिग्रहण पूर्ण होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com