

Rajat Patidar - Shubman Gill | IPL 2026 Final | RCB vs GT
Sakal
IPL 2026 Final RCB vs GT: आयपीएल २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात रविवारी (३१ मे) खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
हे गुजरातचे घरचे मैदानही आहे, त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न गुजरातचा असेल, तर बंगळुरू सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.