Krunal Pandya finally breaks silence on rumours of a rift with brother Hardik Pandya
esakal
Krunal Pandya on Hardik Pandya fight rumours: भारतीय क्रिकेटमध्ये 'पांड्या ब्रदर्स'ची जोडी नेहमीच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये हे दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आता या सर्व अफवांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) अष्टपैलू खेळाडू कृणालने अखेर आपले मौन सोडले आहे.