PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

Rishabh Pant DRS mistake PBKS vs LSG IPL 2026: एक छोटासा निर्णय संपूर्ण सामन्याला कलाटणी देऊन गेला. रिषभ पंत याने DRS न घेण्याचा घेतलेला निर्णय लखनौ सुपर जायंट्सला महागात पडताना दिसला. मोहसिन खानच्या गोलंदाजीवर कूपर कॉनली स्पष्टपणे पायचीत असल्याचे दिसत होते, पण पंतने शेवटच्या क्षणी रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.
Rishabh Pant’s decision not to take a DRS proves costly

Rishabh Pant’s decision not to take a DRS proves costly

esakal

Updated on

Punjab Kings vs Lucknow Super Giants marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील एकमेव अपराजित संघ, पंजाब किंग्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. LSG ला मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि पंजाबचा सामना करणे सोपं नाही याची जाण त्यांना आहे. त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिग्वेश राठीच्या जागी एम सिद्धार्थ याला आज संधी दिली आहे. PBKS विजयी संघच घेऊन मैदानावर उतरला आहे. पंजाबला सुरुवातीलाच धक्के देण्याची संधी होती, परंतु रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) चुकीने त्यांना खड्ड्यात घातले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com