

Rohit Sharma to undergo scans after suffering a hamstring injury
esakal
Rohit Sharma scan results and recovery time: मुंबई इंडियन्ससमोरील अडचणी वाढल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माने ( Rohit Sharma Injured) दुखापतीमुळे मैदान सोडले होते. त्यामुळे त्याच्या पुढील सामन्यात खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. रोहितच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची तीव्रता समजून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये स्कॅन केले जातील. मुंबई इंडियन्सच्या गुरुवारी (१६ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यासाठी रोहितची उपलब्धता त्या स्कॅनच्या निकालांवर अवलंबून असेल.