Rohit Sharma rushes to check on a ground staff member
esakal
Siban Biswas injury Rohit Sharma practice session incident: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. ९ सामन्यांत त्यांना फक्त दोन विजय मिळवता आले आहेत आणि आता उर्वरित ५ सामने जिंकून ते फक्त १४ गुणांपर्यंतच पोहचू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफचे गणित जर तरवर अवलंबून आहे. त्यामुळे मागील पाच सामन्यांना मुकलेला रोहित शर्मा, आता तरी मैदानावर खेळायला उतरेल, अशी चाहत्यांना आशा आहे. रोहित नेट्समध्ये कसून सरावही करतोय, पण मागील पाच सामन्यांपासून संघ व्यवस्थापन त्याच्या तंदुरुस्तीबाबत फार स्पष्ट माहिती देत नाहीयेत.