GT vs CSK Live: साई सुदर्शनचे शतक हुकले! शुभमन, बटलरनेही झोडले! चेन्नईसमोर मोठं लक्ष्य, संजू सॅमसन फलंदाजीला येणार का?

IPL 2026 GT vs CSK Marathi Cricket News: गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत अहमदाबादमध्ये धावांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सलामीला येत पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली आणि CSK च्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ ठरवले.
Shubman Gill, Sai Sudharsan and Jos Buttler dominated CSK bowlers

Shubman Gill, Sai Sudharsan and Jos Buttler dominated CSK bowlers

esakal

Updated on

Gujarat Titans vs Chennai Super Kings Marathi Cricket update: शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील गुरुवारचा सामना गाजवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना या जोडीने रडकुंडीला आणले. सलामीवीर म्हणून सातवी शतकी भागीदारी करताना त्यांनी IPL मधील सर्वात यशस्वी ओपनिंग जोडीचा विक्रम नावावर केला. या दोघांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर जॉस बटलरनेही आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या उभारून दिली. CSK ला विजयासाठी आता जोर लावावा लागणार हे निश्चित आहे. पण, जखमी होऊन मैदानाबाहेर गेलेला संजू सॅमसन ( Sanju Samson) फलंदाजीला येईल का, हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com