

Sameer Rizvi Stars as Delhi Capitals Crush Mumbai Indians in IPL 2026 Clash
esakal
Delhi Capitals vs Mumbai Indians full match report Marathi : समीर रिझवीने ( Sameer Rizvi) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजयाची नोंद करताना IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानावर झेप घेताना पंजाब किंग्सला मागे ढकलले. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि नमन धीर वगळता MI च्या फलंदाजांनी निराश केले. हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) उणीव फलंदाज व गोलंदाजी या दोन्ही विभागात प्रकर्षाने जाणवली.