

Sanju Samson
esakal
Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Updates : चेपॉकच्या मैदानावर अखेर संजू सॅमसनला सूर गवसलेला पाहून चाहते सुखावले. त्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडसह चेन्नई सुपर किंग्सला दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर संजू व आयुष म्हात्रे या जोडीने वादळ आणले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.