IPL 2026 Schedule Update
esakal
IPL 2026 opening match RCB vs SRH Chinnaswamy Stadium : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चे वेळापत्रक अखेर बुधवारी जाहीर करण्यात आले. आधी ठरल्याप्रमाणे स्पर्धेचा पहिला सामना व फायनल ( ३१ मे ) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ ला अवघी १७ दिवस शिल्लक राहिली आहेत आणि तरीही वेळापत्रक जाहीर होत नसल्याने, चाहत्यांमध्ये धाकधुक होती. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आयपीएल २०२६ लाही बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यात भारतातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने IPL 2026 Time Table जाहीर होण्यास आधीच उशीर झाला होता.