IPL 2026: RCB’S FIRST MATCH AT CHINNASWAMY STADIUM NOT CONFIRMED
esakal
M Chinnaswamy Stadium inspection before IPL 2026 matches: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने बुधवारी जाहीर केले. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) २८ मार्च रोजी सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ( SRH) सामना करणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल, असे लिहिले आहे. पण, त्याच निवेदनाच्या शेवटी त्यांनी एक NOTE दिली आहे आणि ती बंगळुरूच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळापत्रकात जरी RCB च्या लढती एम चिन्नास्वामीवर दिसत असल्या तरी त्या तिथे होतीलच याची खात्री नाही, असे त्या NOTE वरून समजतेय.