PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Shardul Thakur takes four wickets against Punjab Kings: धर्मशालामध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात शार्दूल ठाकूरने केलेली भन्नाट गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली आहे. पहिल्याच षटकात १५ धावा दिल्यानंतर शार्दूलने जबरदस्त कमबॅक करत पंजाबचा संपूर्ण डाव हादरवून सोडला.
Shardul Thakur produced a sensational comeback spell for Mumbai Indians

Shardul Thakur produced a sensational comeback spell for Mumbai Indians

esakal

Updated on

Punjab Kings vs Mumbai Indians Marathi Updates : शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) त्याच्या पहिल्या षटकात १५ धावा खाल्ल्यानंतर केलेले कमबॅक अविश्वसनीय होते. पंजाब किंग्सच्या फलंदाजांकडून चोप मिळाल्यानंतर जसप्रीत बुमराहने शार्दूलला थांबवले. पण, प्रभसिमरन सिंग व कूपर कॉनली ही सेट जोडी तोडण्यासाठी १२ व्या षटकात शार्दूलला बोलावले गेले. त्यानंतर पुढील तीन षटकांत त्याने चार विकेट्स घेऊन मुंबई इंडियन्ससाठी सामना फिरवला. मात्र, शेवटच्या तीन षटकांत पंजाबने केलेले पुनरागमन सर्वांना चकित करणारे ठरले आणि त्यांनी मुंबईसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com