Shreyas Iyer’s throw hits Shashank Singh on the head
Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पंजाब किंग्सने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सवर वर्चस्व गाजवलेले दिसतेय.. युझवेंद्र चहलने पाचव्या षटकात नमन धीरचा सोपा झेल टाकला नसता, तर मुंबईचा संघ आणखी अडचणीत सापडला असता. पंजाब किंग्सने ७ षटकांत २ धक्के देताना मुंबईला ६७ धावांपर्यंत मजल मारू दिली आहे. पण, या सामन्यात पंजाबला धक्का दिला आणि शशांक सिंग ( Shashank Singh) जखमी होऊन मैदानाबाहेर गेला.