Sunrisers Hyderabad defeat Chennai Super Kings
esakal
Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ अडवला. सलग दोन विजय मिळवून हैदराबादमध्ये दाखल झालेल्या CSK ला आज अपयश आले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून SRH ला तुलनेने कमी धावसंख्येवर रोखले होते, परंतु चेन्नईच्या फलंदाजांनी निराश केले. संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरले. आयुष म्हात्रेने वादळी फटकेबाजी केली होती, परंतु दुखापतीने त्याला माघारी जावे लागले. हेनरिच क्लासनने अविश्वसनीय झेल टिपून आयुषचे वादळ थांबवले. हैदराबादने हा सामना जिंकून ६ गुणांसह सरस नेट रन रेटच्या जोरावर IPL 2026 Point Table मध्ये चौथ्या क्रमांकावर उडी घेतली.