IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

Tilak Varma fastest hundred for Mumbai Indians in IPL history: आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने इतिहासाला गवसणी घातली आहे. अवघ्या ४५ चेंडूंत नाबाद १०१ धावांची वादळी खेळी करत तिलकने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सनथ जयसूर्याच्या १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
Tilak Varma smashed an unbeaten 101 off just 45 balls against Gujarat Titans

Tilak Varma smashed an unbeaten 101 off just 45 balls against Gujarat Titans

esakal

Updated on

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: मुंबई इंडियन्सने आज चमत्कारच करून दाखवला. पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्यानंतर मुंबई एवढं दमदार पुनरागमन करेल, याचा विचार गुजरात टायटन्सने केलाच नसेल. तिलक वर्माने ( Tilak Varma) पहिल्या १९ चेंडूंत २२ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढील २३ चेंडूंत ८२ धावा चोपून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून तिलकने ४५ चेंडूंत शतक झळकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com