Tim David argues with umpires during ball-testing controversy in MI vs RCB IPL 2026 clash.
esakal
RCB vs Mumbai Indians controversy ball inspection issue: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रविवारी मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूच्या २४० धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला २२२ धावाच करता आल्या. या विजयाने RCB सहा गुणांसह तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिले आहेत, तर MI आठव्या क्रमांकावर आहे. पण, या सामन्यात टीम डेव्हिड ( Tim David) चा ओव्हरस्मार्टनेस चर्चेत आला. त्याने RCB च्या डावात फलंदाजी करताना चेंडू वारंवार तपासला. अम्पायर त्याला रोखत होते, परंतु तो त्यांना दाद देत नव्हता. अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.